मालेगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मनमाड-इंदूर रेल्वेमार्गापैकी मनमाड-मालेगाव-धुळे रेल्वेमार्गाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे
तसेच कसमादे पट्टय़ातील पाणीप्रश्न मिटविण्यासाठी मांजरपाडा दोनच्या
कामास गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री व अखिल भारतीय स्वर्गीय राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे राज्याध्यक्ष विजय नवल पाटील यांनी येथे दिली.
मालेगाव कॉँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पक्षीय कार्यकर्त्यांच्या मासिक बैठकीप्रसंगी ते बोलत...
more... होते. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग ही धुळे- मालेगाव लोकसभा मतदारसंघातील जनतेची प्रामुख्याने गरज आहे.
त्यास रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने आपल्या हिस्स्याच्या आर्थिक खर्चास मंजुरी दिली आहे. मात्र मध्य प्रदेश शासनाकडून तसा निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही.
त्यामुळे सदर कामास प्रारंभ झालेला नाही. मात्र सद्यस्थितीत धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघातील विकासकामांची गरज लक्षात घेता मनमाड - मालेगाव - धुळे या रेल्वेमार्गाचे भूमिपूजन
करण्याचे कॉँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. खंडकरी शेतकर्यांना त्यांच्या हिस्स्याची जमीन देण्यानिमित्त मुख्यमंत्री चव्हाण मालेगाव दौर्याप्रसंगी तशी घोषणा करणार होते.
दुर्दैवाने त्यांचा दौरा लांबणीवर पडला. मात्र आता लोकसभा निवडणुकीआधी आगामी मालेगाव दौर्याप्रसंगी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सदर मार्गाचे भूमिपूजन हे निश्चितपणे होणार आहे