*२२१५५/५६ सोलापूर मिरज एक्सप्रेस कोल्हापूर पर्यंत विस्तारित करण्याची प्रवाशांची मागणी*
२२१५५/५६ सोलापूर मिरज सुपरफास्ट एक्स्प्रेस लवकरात लवकर चालू करावी आणि ती कोल्हापूर पर्यंत विस्तारित करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
कोरोनाच्या आधी सोलापूर/पंढरपूर मधून कोल्हापूरला जाणारे प्रवासी २२१५५ मधून मिरज पर्यंत जाऊन तेथून १६५८९ राणी चेन्नम्मा एक्सप्रेस पकडून कोल्हापूरला जायचे. तसेच कोल्हापूर वरून १६५९० राणी चेन्नम्मा एक्सप्रेस पकडून मिरज पर्यंत येऊन २२१५६ सोलापूर...
more... एक्स्प्रेसने पुढील प्रवास करायचे.
परंतु काही तांत्रिक कारणामुळे दक्षिण पश्चिम रेल्वेने १६५८९/९० राणी चेन्नम्मा एक्सप्रेस मिरज ते कोल्हापूर दरम्यान रद्द केली आहे, त्यामुळे २२१५५/५६ सोलापूर मिरज एक्सप्रेस कोल्हापूर पर्यंत विस्तारित करण्याची जोरदार मागणी कुर्डूवाडी, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील होऊ लागली आहे.
Solapur - 02.03.2021