दौलताबाद - चाळीसगाव रेल्वे मार्गाला मान्यता
Updated: 21 Aug 2019, 04:00 AM
म टा...
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या...
more... अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दौलताबाद - चाळीसगाव या ८१ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला अखेर महाराष्ट्र रेल्वे डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (एमआयडीएल) संचालक मंडळाने मंजुरी दिली असून, हे काम लवकरच सुरू होणार आहे.
नांदेड ते औरंगाबाद मार्गे जाणाऱ्या गाड्यांना सध्या मनमाडहून उत्तर भारतात जावे लागते. दौलताबाद ते चाळीसगाव मार्गाचे काम तयार झाल्यास या रेल्वेंना मनमाडकडे जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे हा मार्ग करण्याची मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली होती. रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली. आयआयटी खरकपूर संस्थेने सर्वेक्षणही केले होते. मात्र, गेल्या चार वर्षांत यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा, रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, सचिव प्रल्हाद पारटकर, कन्नडचे लोकप्रतिनिधी, व्यावसायिक, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी पाठपुरावा केला. संसदेत खासदार इम्तियाज जलील आणि खासदार उन्मेष पाटील यांनीही प्रश्न उचलला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा मार्ग 'एमआरडीएल'च्या माध्यमातून करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर 'एमआरडीएल'च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष अजॉय मेहता यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या मार्गाला मंजुरी देण्यात आली असून, हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर वित्त विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.
……
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौलताबाद चाळीसगाव रेल्वे मार्गाची घोषणा केली होती. त्यानुसार 'एमआरडीएल'ने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांच्या मतदार क्षेत्रातून हा मार्ग जाणार असल्याने ते ही या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करून काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
\B- अनंत बोरकर, अध्यक्ष, रेल्वे कृती समिती औरंगाबाद
\B
\Bरेल्वे मार्गाचे फायदे
\B- औरंगाबाद चाळीसगाव अंतर फक्त तासाभराचे
- उत्तर भारतातली मालवाहतूक थेट औरंगाबाद पर्यंत
- मनमाड रेल्वे स्टेशनवर होणारी रेल्वेची गर्दी कमी होईल
- बिकानेर, दिल्ली तसेच अन्य मार्गावर रेल्वेची संख्या वाढेल……